नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार | Subhash Chandra Bose Quotes in Marathi

सुभाष चंद्र बोस यांची आज जयंती. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. या लेखातून आपण सुभाष चंद्र बोस यांचे विचार जाणून घेणार आहे. Subhash Chandra Bose Quotes in Marathi

सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये ओरिसातील कटक येथे झाला. ते अभ्यासात अत्यंत हुशार होते शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी सुभाषचंद्र बोस यांना इंग्लंडला पाठवलं

त्या ठिकाणी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात University of Cambridge प्रशासकीय सेवा परिक्षेचा अभ्यास केला. या परीक्षेत ते उत्तीर्ण देखील झाले. मात्र त्या काळातच जालियनवाला बाग हत्याकांडची घटना घडली. या घटनेने ते अस्वस्थ झाले आणि भारतात परतले. पुढे ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवलं आणि त्यासाठीच आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं.

Subhash Chandra Bose Quotes in Marathi

लक्षात ठेवा, अन्याय सहन करणं आणि चुकीच्या गोष्टींसोबत हातमिळवणी करणं सगळ्यात मोठा गुन्हा आहे.

Subhash Chandra Bose Quotes in Marathi

आपलं कर्तव्य आहे की आपण स्वातंत्र्याची किंमत रक्ताने चुकवावी.

आपल्याला बलिदान आणि कष्टाने जे स्वातंत्र्य मिळेल त्याचे रक्षण करण्याची ताकद आपल्यात असायला हवी.

माझा अनुभव असा आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात आशेचा किरण येतो, ज्यामुळे आपण आपल्या ध्येयापासून दूर जात नाही.

15+ स्वामी विवेकानंद यांचे खास विचार | Swami Vivekananda Quotes in Marathi

ज्या एक व्यक्ती ध्येयवेडा नसतो, तो व्यक्ती कधीही महान बनू शकत नाही. मात्र या सोबतच त्या व्यक्तीकडे इतर काही गोष्टी देखील असणे गरजेचे आहे.

जे लोक आपल्या ताकदीवर विश्वास ठेवतात, ते कायम पुढे जात असतात. मात्र जे लोक उधारीच्या ताकतीवर जगतात ते कधी ना कधी जखमी होतात.

Subhash Chandra Bose Quotes in Marathi

Subhash Chandra Bose thoughts in Marathi

आपला प्रवास कितीही भयानक कष्टदायक आणि खराब असला तरी आपल्याला पुढे चालत राहणं गरजेचे आहे. कारण यशाचा दिवस दूर असू शकतो मात्र कधी ना कधी तो उगवतोच.

आईचं प्रेम सगळ्यात निस्वार्थी असतं त्याला कोणत्याही पद्धतीत मोजला जाऊ शकत नाही.

स्वातंत्र्य दिलं जात नाही ते घ्यावं लागतं.

एखादा व्यक्ती नवीन विचारांसाठी बलिदान देऊ शकतो. पण त्याच्या मृत्यूनंतर तो विचार हजारोंच्या संख्येने लोकांच्यात भिनला जातो.

जे सैनिक नेहमी आपल्या देशासोबत एकनिष्ठ राहतात, जे आपल्या राष्ट्रासाठी प्राणाची आहुती द्यायला सदैव तत्पर असतात ते कायम अजिंक्य राहतात.

केवळ चर्चा करून इतिहासात कोणताही खरा बदल कधीच झालेला नाही.

Subhash Chandra Bose marathi quotes

आपलं आयुष्य जास्तीत जास्त सत्य असलेल्या सिद्धांतावर व करणं गरजेचं आहे

Subhash Chandra Bose Marathi quotes

केवळ फौजफाटा पैसे आणि शस्त्रांचा आधारावर विजय मिळवता येणार किंवा स्वातंत्र्य घेणार शक्य नाही शौर्य दाखवण्यासाठी तसंच वीरता दाखवण्यासाठी प्रेरणाशक्ती असणे देखील तितकेच गरजेचे आहे

जर तुमच्या जीवनात कोणताही संघर्ष नसेल, तुम्हाला कोणतेही धाडसी निर्णय घ्यायचे नसतील तर तुमच्या आयुष्याला काहीच अर्थ नाही.

इंग्रजांना देशातून हाकलून देशाला स्वतंत्र देणं या प्रामाणिक हेतूने ते झपाटले होते. मात्र त्यांच्या कार्याला जेवढं हवं तेवढं महत्त्व देण्यात आलं नाही.

सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी कथित विमान अपघातात झाल्याचं सांगितलं जातं. मात्र विमान अपघातानंतर देखील ते जिवंत असल्याचं अनेक जण मानतात.

Leave a Comment

error: Content is protected !!