नक्की वाचा: ताण तणावमुक्त जीवन जगण्याचे चार उपाय | How to live stress free life in marathi

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी असो की व्यवसायिक नाहीतर नोकरी करणारा एखादा व्यक्ती, प्रत्येकाला ताणतणावाने ग्रासले आहे. कारण स्पर्धादेखील प्रचंड वाढली आहे. इतरांसोबत स्पर्धा करण्याच्या नादात आपण स्वतःला विसरू लागलो आहे.  stress free life tips in marathi

अशा परिस्थितीत तणावमुक्त जीवन जगण्यासाठी नेमकं काय करायला हवं, याच्या शोधात प्रत्येकजण असतो. या लेखातून तणावमुक्त जीवन जगण्यासाठी नेमके काय करू शकतो हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.

हे उपाय जर तुम्ही चांगल्या पद्धतीने फॉलो केले तर तुम्हाला त्याची नक्कीच चांगले परिणाम दिसतील

ताणमुक्त जीवन जगण्याचे उपाय stress free life tips in marathi

भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार करू नका

stress free life tips in marathi

जर आपण नातेसंबंधांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर अनेक वेळा भूतकाळात काही तरी वाईट गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेल्या असतात.

मात्र काही लोक भूतकाळात घडलेल्या गोष्टींना विसरून जातात, तर काही जण त्यांना धरून ठेवतात. अशा लोकांमध्ये तणाव वाढलेला आपल्याला दिसून येतो.

कारण भूतकाळात घडलेली एखादी वाईट गोष्ट आपण आता बदलू शकत नाही. त्यामुळे त्यावर फारसा विचार करण्यापेक्षा येणाऱ्या काळात आपण चुका कशा दुरुस्त करू यावर लक्ष द्यायला हवं.

महत्त्वाचं म्हणजे वर्तमान काळात तुम्ही काय करणार आहे हे तुमच्या हातात असतं. त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित केलेलं कधीही चांगलं.

असं केल्यानंतर तुमचा तणाव नक्कीच कमी होईल.

सकारात्मक कसं राहायचं? ‘या’ ४ स्टेप्स करून पहा | How To Stay Positive In Marathi

2. दररोज थोडा व्यायाम करण्याची सवय लावा

जेव्हा आपल्याला राग आलेला असतो किंवा तणाव आलेला असतो अशावेळी जर तुम्ही व्यायाम केला तर तुम्हाला नक्कीच ताजंतवानं वाटू लागतं.

कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला तणाव येत असतो तेव्हा ठराविक हार्मोन्स त्याच्या शरीरात तयार होत असतात. 

मात्र जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमचं लक्ष व्यायामावर लागल्यानं तणाव निर्माण करणारी हार्मोन्सची पातळी आपोआप कमी होऊ लागते. याउलट तुम्हाला ताजतवानं करणारे हार्मोन्स शरीरात तयार होऊ लागतात.

तसंच मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला झाल्याने तुम्ही व्यवस्थित विचार करू शकता

अनेक संशोधनातून असे दिसून आलं आहे की जे लोक दररोज व्यायाम करत असतात, त्यांच्यात आत्मविश्वास वाढलेला दिसून येतो.

तसंच ताण तणावाची पातळी देखील कमी झाल्याचं दिसून आलं आहे. 

त्यामुळे तुम्ही ताण तणाव कमी करण्यासाठी व्यायाम करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे तुम्हाला व्यायाम करण्यात सातत्य ठेवायचं आहे. जर तुम्ही सलग एक महिना व्यवस्थित व्यायाम केला, तर त्याचे नक्की चांगले बदल तुम्हाला जाणून येईल.

सकारात्मक विचार जे तुम्हाला प्रेरणा देतील | Positive Quotes in Marathi with images

3. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा, उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा

सध्याच्या काळात जर आपण नोकरीच्या उदाहरण घेतलं तर या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. कंपन्यांकडून दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याचं आपण पाहतो.

यामुळे होतं काय की जे लोक नवीन गोष्टी शिकायला टाळाटाळ करतात ते हळूहळू मागे पडू लागतात आणि त्यांच्यात मग तणाव वाढायला सुरुवात होते, कारण नोकरी जाण्याची भीती असते.

पण या ऐवजी जर तुम्ही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू लागला तर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि स्पर्धेत टिकून राहाल. त्यामुळे ताणतणाव देखील कमी होईल. तसंच तुमच्या ज्या उणीवा आहेत, त्या मान्य करा, त्या शोधून काढा आणि त्या दूर कशा करता येईल याचा प्रयत्न करा.

4. तुमचं ध्येय निश्चित करा आणि त्या दृष्टीने काम करायला लागा

stress free life tips in marathi

जोपर्यंत आपण एखादे ध्येय निश्चित करत नाही, तोपर्यंत ते प्राप्त कसं करायचं हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसांमध्ये किंवा महिन्यात किंवा ठराविक वर्षांमध्ये तुम्हाला जे काही मिळवायचे आहे ते ठरवण्याचा प्रयत्न करा आणि त्यादृष्टीने नियोजन करा. 

असं केलं तर तुम्हाला तुमचं ध्येय मिळवण्याच्या दृष्टीने योग्य ते प्रयत्न करता येतील आणि असं केलं तर नक्कीच तुम्हाला तणाव येणार नाही किंवा तो कमी होऊ शकतो.

दिवसभरातल्या कामाचे नियोजन करत असताना एक चेक लिस्ट तयार करा. यामध्ये सर्वात महत्वाची काम, कमी महत्त्वाची अशी विभागणी करू शकता.

जेणेकरून कोणतं काम पहिल्यांदा करायचं आहे आणि कोणतं नंतर हे समजू शकतं आणि त्यादृष्टीने काम करणं तुम्हाला सोपे जाईल. यामुळे नक्कीच ताणतणाव देखील कमी होईल

Leave a Comment

error: Content is protected !!