जाणून घ्या डाळिंब खाण्याचे फायदे | Health benefitof pomegranate in marathi

आपल्या भारतात विशेषतः महाराष्ट्रात डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे डाळिंब सहज उपलब्ध होतात. या डाळिंबाचा आपल्या आहारात समावेश असणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या लेखातून डाळिंब खाण्याचे फायदे आपण जाणून घेणार आहे. Benefits of pomegranate in marathi

हजारो वर्षांपासून डाळिंबाचा वापर औषध म्हणून केला जातोय. जर तुम्ही त्याचे सेवन केलं तर तुमच्या शरीरासाठी त्याचे अनेक फायदे होऊ शकतात.

डाळिंब खाण्याचे फायदे Benefits of pomegranate in marathi

अँटिऑक्सिडंटचं प्रमाण

आपल्या शरीरातील पेशींचे संरक्षण करण्यासाठी अँटिऑक्सिडंट गरजेचं असतं. हे अँटिऑक्सिडंट आपल्याला डाळिंबातून मिळू शकतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की गवती चहापेक्षा तीन पटीने जास्त अँटिऑक्सिडंट डाळिंबात असतात आणि जर डाळिंबाची इतर फळांसोबत तुलना केली तरीदेखील यात अँटिऑक्सिडंटचं प्रमाण डाळिंबात सर्वाधिक आहे.

विटामिन सी

प्रौढ व्यक्तीला दिवसाला 65 ते 90 मिलिग्रॅम विटामिन सीची गरज असते. डाळिंबाचा रस पिल्यानंतर तुमची साधारण 40 टक्के व्हिटॅमिन C ची गरज भागली जाते.

हृदयासाठी फायदेशीर

डाळिंब आपल्या हृदयासाठी देखील फायदेशीर आहे. डाळींबातील असणारे महत्त्वाचे पोषक तत्व रक्तवाहिन्यांना स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. जेणेकरून शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो आणि जर शरीरातील रक्तप्रवाह चांगला असेल तर शरीराचे इतर अवयव देखील चांगल्या पद्धतीने काम करतात.

गर्भवती महिलांना फायदा

गर्भवती महिलांना डाळिंबाच्या सेवनाने फायदा होतो. डाळिंबात विटामिन C चे प्रमाण जास्त असतं. तसंच फ्लोरिक ॲसिड गर्भवती महिलांच्या पोटात असणाऱ्या गर्भासाठी फायदेशीर ठरतं. डाळिंबात असणाऱ्या पोटॅशियममुळे देखील प्रसूती दरम्यान होणारा त्रास कमी होतो.

लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी फायदेशीर

डाळिंबाचं सेवन ॲनेमियासाठी फायदेशीर ठरतं. ॲनेमिया या आजारात शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होतं आणि यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरात लोहाची कमतरता. ही कमतरता भरून काढण्यासाठी डाळिंबाचे सेवन फायदेशीर ठरू शकतं.

डाळिंबाचं नियमित सेवन केल्यानंतर शरीरात लोहाची कमतरता पूर्ण होते. एवढेच नव्हे तर लाल रक्तपेशी देखील वाढवण्याचं काम होतं. तसेच शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील योग्य राहतं.

केसांची वाढ होण्यास मदत

डाळिंबाचं सेवन केल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. डाळिंबामध्ये केसांची मुळं मजबूत होण्यासाठी लागणारे आवश्यक अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. तसंच डोक्याच्या वरच्या भागात रक्तप्रवाह वाढल्याने केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होते.

डाळींबाचे सेवन कधी करणं चांगलं आहे? What is the best time to eat pomegranate?

कोणतेही फळ खाण्यासाठी सकाळची वेळ चांगली मानली जाते. कारण सकाळच्या वेळी पचन संस्था चांगल्या पद्धतीने काम करत असते. तसेच या वेळी फळातील साखर योग्य पद्धतीने रक्तात शोषली जाते आणि व्यक्तीला त्यातून सगळी पोषक तत्व मिळतात. त्यामुळे डाळिंबाचं सेवन देखील सकाळच्या वेळी करा व शक्यतो रात्रीच्या वेळी फळ सेवन टाळावं. 

डाळिंब सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी रात्रीच्या वेळी डाळिंब खाऊ नये. ते उलट तुमच्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण रात्रीच्या वेळी संपूर्ण पचनसंस्था मंदावते. डाळिंबातील फायबर्स चांगल्या पद्धतीने पचले जात नाहीत.

तसेच या फळातील साखरेचं देखील फॅट मध्ये रूपांतर होऊन तुमच्या शरीरात साठून राहू शकते. डाळिंबात फायबर्स, विटामिन के, सी आणि बी मोठ्या प्रमाणात असतात. तसेच लोह, पोटॅशियम, झिंक या सारखे घटक मिळतात.

डाळिंब खाल्ले की लगेच पाणी पिणं चांगलं असतं का?

अनेकजणांना फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. मात्र यामुळे तुम्हाच्या शरीराला तोटा होऊ शकतो. कारण अन्नपचनासाठी महत्त्वाचा असणारा गॅस्ट्रिक ज्यूस पाणी पिल्यानंतर पातळ होतो. त्यामुळं फळाचा रस योग्य पद्धतीने पचण्यास अडचण येऊ शकते.

किडनीचे आजार असणाऱ्यांना डाळिंब खाणं सुरक्षित आहे का? Is pomegranate good for your kidneys?

नॅशनल किडनी फाउंडेशन येथील चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर जोसेफ वासलॉटी म्हणतात की डाळिंबात एंटीऑक्सीडेंट आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे किडनीचे आजार असणाऱ्या लोकांना डाळिंबाच्या सेवनाने समस्या निर्माण होऊ शकते.

तुम्हाला डाळिंब खाण्याचे फायदे Benefits of pomegranate in marathi लेख आवडला असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा.

(या लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीचा वैद्यकीय वापर करण्याअगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)

Leave a Comment

error: Content is protected !!