अननस खाण्याचे फायदे | Benefits of Pineapple in Marathi

अनेक जणांना रसरशीत अननस बघितले की तोंडाला पाणी सुटतं. रसाळ अननस खाल्लं की आपल्या मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. पण हे अननस आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी देखील तितकाच फायद्याचं आहे. या लेखात आपण अननस खाण्याचे शरीराला होणारे फायदे जाणून घेणार आहे. Benefits of Eating Pineapple in Marathi

Benefits of Eating Pineapple in Marathi अननसाचे आरोग्यदायी फायदे

अननसात आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे विटामिन्स, मिनरल्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट यांचा समावेश असतो. खरंतर अननसाचा अगदी प्राचीन काळापासून औषध म्हणून वापर केला जातो. हे फळ मूळच अमेरिकेतील असून आता ते जगभरात उगवलं जातं.

रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहते

अननसात विटामिन सी चे प्रमाण जास्त असतं. हे विटामिन आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं असतं. कारण रोगप्रतिकारक्षमता चांगली ठेवण्यासाठी विटामिन सी ची आवश्यकता असते. आपल्याला एक कप अननसातून साधारण 80 मिलिग्रॅम विटामिन सी मिळू शकतं. 

महत्वाचं म्हणजे महिलांमध्ये दिवसाला 75 मिलिग्रॅम विटामिन सी गरजेचं असतं तर पुरुषांसाठी हे प्रमाण 90 मिलिग्रॅम आहे. त्यामुळे एक कप अननस खाल्ल्यावर तुमची विटामिन सी ची गरज 88 टक्के पूर्ण होते. आजारांविरोधात लढण्यासाठी आणि रोगप्रतिकारक्षमता तंदुरुस्त ठेवण्यासाठी शरीराला विटामिन सी ची गरज असते.

किवी फळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे | Health benefits of eating kiwi fruit in marathi

अननसात ब्रोमिलिन नावाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आढळतो. बायोटेक्नॉलॉजी रीसर्च इंटरनॅशनल यामध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार या घटकामुळे डायरियाचे परिणाम कमी होतात. तसंच पचन प्रक्रिया देखील सुधारते. 

अगदी जुन्या काळापासून मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये पचनासंबंधीच्या आजारांचे उपचार करण्यासाठी अननसाचा वापर केला जातो. अननसातील ब्रोमिलिन या घटकात जखमांना बरं करण्याची देखील ताकद असते.

हाडांना बळकटी मिळते

आपली हाडं मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमसोबत मॅंगनीज याची देखील आवश्यकता असते आणि अननस मॅंगनीजचा चांगला स्रोत आहे. एक अननस खाल्ल्यावर दिवसभरातील 76 टक्के मॅंगनीजची गरज भागविली जाते..

काजू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे | Health benefits of eating cashews in marathi

पेशींचे संरक्षण करण्यासाठी फायदेशीर

मोलेक्युल्समध्ये 2014 ला प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार अननसात एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त आहे. यात फिनोलेक्स आणि व्हिटॅमिन सी चा समावेश आहे. आहारात यांचा समावेश असल्यास पेशींचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. 

कारण शरीरात असणार्‍या फ्री रॅडिकल्समुळं पेशींना हानी पोचू शकते. मात्र आहारात जर एंटीऑक्सीडेंट योग्य प्रमाणात असेल तर तुमच्या पेशींचे रक्षण होतं.

लहान मुलांच्यात व्हायरल संसर्गाचे प्रमाण कमी

जर्नल ऑफ न्यूट्रिशन आणि मेटाबॉलिझम यामध्ये प्रसिद्ध झालेल्या 2014 च्या एका अभ्यासानुसार ज्या लहान मुलांनी अननसाचे सेवन केले त्यांच्यात व्हायरल आणि बॅक्टेरियल संसर्गाचे प्रमाण अननसाचे सेवन न करणाऱ्या मुलांच्या तुलनेत कमी आढळून आले. 

हा अभ्यास नऊ आठवड्यांचा होता. या अभ्यासातून संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की दररोज साधारण 140 ते 180 ग्रॅम अननसाचं सेवन केल्यावर व्हायरल किंवा बॅक्टरिअल संसर्ग होण्याचा धोका कमी होतो किंवा जर संसर्ग झाला तर त्याचा कालावधी कमी असतो.

कोलेस्ट्रॉलसाठी अननस चांगले आहे का? Is Pineapple Good For Cholesterol?

होय, अननस खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. अननस हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्रोत आहे जे निरोगी शरीर आणि रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी आवश्यक आहे.

रात्री अननस खाणे योग्य आहे का? Is it OK to eat pineapple at night?

संशोधकांनी शोधून काढले की अननस खाल्ल्यानंतर शरीरातील मेलाटोनिन मार्कर 266 टक्क्यांनी वाढू शकतात. याचा अर्थ असा आहे की झोपण्यापूर्वी या गोड पदार्थाचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला लवकर झोप लागण्यास आणि जास्त वेळ झोपण्यास मदत होऊ शकते.

तुम्हाला अननस खाण्याचे आरोग्यदायी फायदे health benefits of eating pineapple हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!