किवी खाण्याचे आरोग्यदायी फायदे | Health Benefits of Kiwi fruit in Marathi

जर तुम्हाला डेंगू सारखा आजार झाल्यानंतर डॉक्टर अनेक वेळा किवीचे फळ खाण्याचा सल्ला देतात. कारण किवीचे फळ खाल्ल्याने रक्तातील प्लेटलेट्स वाढतात. मात्र या फळाचे इतर देखील फायदे आहेत. या लेखातून आपण किवीचे फळ खाण्याचे फायदे आपण जाणून घेणार आहे. Health Benefits of Kiwi fruit in Marathi

किवीच्या फळाचे सेवन केल्यानंतर तुमच्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. वयासोबत डोळ्यांची क्षमता कमी होते. पण किवीच्या फळाचे सेवन त्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. 

या फळात विटामिन सी चे प्रमाण जास्त असल्याने त्वचेचा सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणांपासून बचाव होऊ शकतो. किवीच्या फळात विटामिन ई चा देखील समावेश असल्याने त्वचा चांगली आणि चमकदार बनते.

Health Benefits of Kiwi fruit in Marathi

केस मजबूत आणि सुंदर राहतात

केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी किवीच्या फळाचे सेवन फायदेशीर ठरू शकतात. कारण यात झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे पोषक तत्व असतात. ही पोषक तत्व केस वाढवण्यासाठी मदत करतात. तसंच केसांची गळती रोखण्यासाठी विटामिन्स विटामिन सारखे पोषक घटक देखील किवीच्या फळात असतात.

किवीच्या फळात असणाऱ्या तांब्यामुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो.

यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर

एका संशोधनानुसार किवीच्या फळाचे सेवन करणे यकृतासाठी फायदेशीर ठरू शकतं. कारण या फळात एंटीऑक्सीडेंट घटक असतात. यामुळे पेशींचे नुकसान होणं टाळत जातं.

जाणून घ्या डाळिंब खाण्याचे फायदे | Benefits of eating pomegranate in Marathi

डोळ्याचे आरोग्य चांगलं राहतं

डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी किवीचे फळ फायदेशीर ठरतं. एका संशोधनानुसार किमी फळात जेंथीन आणि ल्युटीन यासारखे घटक आढळतात. हे घटक डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गरजेचे असतात.  वयानुसार वयानुसार डोळ्यांची कमी होणारी क्षमता किवीच्या सेवनाने रोखली जाऊ शकते.

रोगप्रतिकारक क्षमता वाढते

रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी किवीच्या फळाचे सेवन फायदेशीर ठरू शकतं. कारण एनसीबीआयच्या एका अभ्यासानुसार किवीच्या फळात विटामिन सी, फायबर्स, पॉलिफिनॉल, कॅरोटेनोईड यासारखे पोषक तत्व आढळतात. ही तत्व रोगप्रतिकारक्षमता चांगली ठेवण्यासाठी मदत करतात. तसेच किवीच्या फळाचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. Eating kiwi fruit can protect you from many diseases

जाणून घ्या खजूर खाण्याचे हे फायदे | Benefits of eating dates in marathi

उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होऊ शकते

उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी किवीच्या फळाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. स्त्री आणि पुरुषांवर केल्या गेलेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. या अभ्यासात 8 आठवडे दररोज तीन किवीची फळं खाणाऱ्या लोकांमध्ये रक्तदाबाची समस्या कमी झाल्याचं दिसून आलं.

तुम्हाला किवी खाण्याचे फायदे Health benefits of eating kiwi fruit in marathi हा लेख आवडला असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा. (हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीचा वैद्यकीय वापर करण्याअगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)

Leave a Comment

error: Content is protected !!