डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे | Benefits of Dark Chocolate in marathi

चॉकलेट म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. पण मार्केटमधील जवळपास सगळ्याच चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा चॉकलेटचं सेवन आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतं. Dark chocolate health benefits in marathi

पण डार्क चॉकलेटचं सेवन केलं तर त्याचे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. डार्क चॉकलेटच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते.

Dark chocolate health benefits in marathi

मेंदू, हृदयाचं कार्य देखील सुधारण्यास मदत होते. या चॉकलेटमध्ये हृदयाचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म असतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार होण्याची शक्यता कमी होते.

एका अभ्यासानुसार सलग पाच दिवस जास्त प्रमाणात कोकोआ असणाऱ्या डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने मेंदूतील रक्ताचा प्रवाह वाढल्याचे दिसून आलं. तसेच कोकोआमध्ये कॅफेन, थिऑब्रोमिन यासारखे रासायनिक घटक असतात, ज्यामुळे मेंदूचं कार्य वाढण्यास मदत होते.

एवढेच नव्हे तर डार्क चॉकलेटमध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे हृदय व रक्तवाहिन्यांच्या संबंधी आजारांपासून संरक्षण मिळू शकतं. महत्त्वाचं म्हणजे डार्क चॉकलेट आणि आपण नेहमी खातो ती चॉकलेट यात थोडा फरक असतो.

मार्केटमधील चॉकलेट्स साखरेने भरलेल्या असतात. तर डार्क चॉकलेटमध्ये कोकोआचं प्रमाण जास्त आणि साखरेचं प्रमाण कमी असतं. जेवढी जास्त चॉकलेट कडवट तेवढं कोकोआचं प्रमाण जास्त.

डार्क चॉकलेटच्या बाबतीत अनेक लोकांना काही प्रश्न पडतात. त्यातील सहसा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ.

दररोज डार्क चॉकलेट खाणं योग्य ठरतं का?

दररोज जास्त डार्क चॉकलेटचे सेवन केले तर ते तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम करेल असं काही नाही. मात्र त्याचे प्रमाण हे मर्यादित असायला हवं.

तज्ञांनी सुचवल्याप्रमाणे साधारण दिवसाला 30 ते 60 ग्रॅम डार्क चॉकलेटचे सेवन फायदेशीर ठरतं. पण तुम्ही जर जास्त चॉकलेट खाल्ली तर तुमच्या शरीरात जास्त कॅलरीज जाऊ शकतात.

डार्क चॉकलेट विकत घेताना कशी निवडायची?

ज्या डार्क चॉकलेटमध्ये कोकोआ कंटेंट 70 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशी चॉकलेट आरोग्याला फायद्याची ठरते. कारण या चॉकलेटमध्ये एंटीऑक्सीडेंट आणि इतर गुणधर्म जास्त आढळतात.

डार्क चॉकलेट खाण्याची योग्य वेळ कोणती?

एनडीटीव्हीने प्रसिद्ध केलेल्या एका लेखानुसार डार्क चॉकलेट आपण कधीही खाऊ शकतो. पण ज्या लोकांना वजन कमी करण्याची इच्छा आहे त्यांनी रिकाम्या पोटी चॉकलेट खाणं फायदेशीर ठरतं किंवा जेवण केल्यानंतर 30 मिनिटांनी देखील चॉकलेट खाता येते.

तुम्ही दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण याच्या मधल्या काळात स्नॅक्स म्हणून चॉकलेट खाऊ शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!