जाणून घ्या खजूर खाण्याचे हे फायदे | Benefits of eating dates in marathi

अनेक वेळा डॉक्टर अशक्तपणा आल्यावर खजूर खाण्याचा सल्ला देतात. कारण खजुराच्या सेवनाने तुमच्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. अन्नपचन, हाडांचे आरोग्य तसेच वजन वाढवण्यासाठी खजूर फायदेशीर ठरते. खजूर खाल्ल्यानंतर शरीराला नेमके कोणते फायदे मिळतात हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. Benefits of eating dates in marathi  

Benefits of Dates in marathi

शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक

खजूरामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची पोषक तत्व असतात. 100 ग्रॅम खजूर मध्ये 277 कॅलरीज मिळतात. तसेच त्यामध्ये 75 ग्रॅम carbohydrates तर 7 ग्रॅम फायबर्स असतात. त्याच बरोबर 2 ग्रॅम एवढे प्रोटीन देखील मिळते. त्याचबरोबर पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर यासारखी शरीराला आवश्यक असणारी खनिज द्रव्ये देखील मिळतात.   खजुरामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात. एंटीऑक्सीडेंट हे पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात. खजुरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.  

खजूर अन्नपचनासाठी फायदेशीर

अन्नपचन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आहारात फायबर्सचा समावेश गरजेचा असतो. 100 ग्रॅम खजूरामध्ये 7 ग्रॅम फायबर असतात. त्याचबरोबर खजुरामध्ये असणारे फायबर्स रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करू शकतात.   

त्याचबरोबर खजुरामध्ये जरी साखर असली तरी खजूर खाल्ल्यानंतर रक्तातील साखर अचानक वाढत नाही. याला खजूरामध्ये असणारे फायबर्स जबाबदार असू शकतात.  

अननसाचे आरोग्यदायी फायदे | Benefits of Pineapple in Marathi

खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी आहे. ग्लायसेमिक इंडेक्‍सच्या मदतीने एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील साखर किती प्रमाणात वाढते हे आपण सांगू शकतो.  

खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही खजूर खाल्ल्यानंतर देखील रक्तातील साखर अचानक वाढत नाही.  

हाडांचे आरोग्य सुधारू शकते   

खजुरामध्ये कॉपर, मॅग्नेशियम, सेलेनियम तसेच मॅंगनीज यासारख्या खनिज द्रव्यांचा साठा आहे. हे खनिज द्रव्य हाडांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी गरजेचे असतात.  

नॉर्थ डकोटा स्टेट युनिव्हर्सिटी केलेल्या अभ्यासानुसार खजुरामध्ये बोराॅनचे प्रमाण देखील आढळते, की जे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते.  

काजू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे | Health benefits of eating cashews in marathi

रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी फायदेशीर  

खजुरामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. योग्य प्रमाणात पोटॅशियमची गरज न भागल्यास मुतखडा होण्याचा धोका असतो.  

त्याच बरोबर खजुरामध्ये असणाऱ्या फायबर्स मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि त्याचबरोबर आहारातील सोडियमचे प्रमाण संतुलित केले जाते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.  

रातांधळेपणात खजूराचे सेवन फायदेशीर  

रातांधळेपणा विटामिन ए च्या कमतरतेमुळे होतो. खजुरामध्ये विटामिन ए चे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे ज्या भागात खजूर जास्त प्रमाणात खाल्ले जातात, त्याठिकाणी रातांधळेपणा असणार्‍या लोकांचे प्रमाण कमी आढळते.  

केसांच्या वाढीसाठी फायदेशीर  

खजुराचे सेवन केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. कारण खजुरात लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं डोक्याच्या वरच्या भागात रक्तप्रवाह चांगल्या पद्धतीने वाढू शकतो की जो केसांच्या वाढीसाठी गरजेचा असतो.

त्याचबरोबर खजुरात असणाऱ्या विटॅमिन ई मुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. मात्र यावर अजून संशोधन होणे गरजेचे आहे. तसंच काही ठिकाणी मानलं जातं की खजुराचा आहारात नियमित समावेश केल्याने केसांना पांढरं होण्यापासून वाचवले जाऊ शकतं.  

किवी खाण्याचे आरोग्यदायी फायदे | Health Benefits of Kiwi fruit in Marathi

पोटाची चरबी कमी करण्यासाठी  

चरबी करण्यासाठी मदत खजुराच्या सेवनाने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते. कारण खजुरात फायबर्स प्रमाण जास्त असतं आणि जर तुमच्या आहारात फायबर्सचे प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला भूक कमी लागते आणि सतत काही ना काही खाण्याची इच्छा कमी होते. फायबर्स पचायला वेळ लागत असल्याने तुम्हाला जास्त कालावधीसाठी आपलं पोट भरलं आहे, असं वाटतं.  

पोटाच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळू शकते  

एका संशोधनानुसार खजुरात मिळणाऱ्या काही घटकांमुळे पोटाचा कॅन्सर (कोलन कॅन्सर) रोखला जाऊ शकतो. खजुरात आढळणारे पॉलिफिनॉल कॅन्सर पासून संरक्षण देऊ शकतात  

नैसर्गिक गोडी वाढवण्यासाठी वापर

खजुरात फ्रुक्टोज नावाची साखर आढळते आणि या कारणामुळे खजूर गोड लागतात. तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात पांढरी साखर वापरण्याऐवजी खजुराचा वापर करू शकता. यासाठी पाणी आणि खजूर एकत्र करून त्याची पेस्ट बनवून त्याचा वापर करू शकता.  

एखादा पदार्थ बनवण्यासाठी एक वाटी साखरेची गरज लागत असेल तर त्या जागी एक वाटी खजुराची पेस्ट वापरावी.

खजुराच्या सेवनाने जरी आपल्याला फायदा होत असला तरी त्याचं अतिसेवन केल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकतो.

कारण जर तुम्ही जास्त खजूर खात असाल तर तुमचं वजन मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. त्यामुळं त्याचं सेवन मर्यादित असायला हवं.   

जास्त खजूर खाल्ल्याने हाइपरकलेमिया होऊ शकतो. या आजारात रक्तातील पोटॅशियम वाढल्याने होतो. कारण खजुरात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असतं. तसंच लहान बाळांना खजूर देणे टाळावं. कारण त्यांचे आतडे खजुरा सारख्या कडक गोष्टीला पचवू शकत नाही.

अशा प्रकारची योग्य काळजी घेतली तर तुम्ही खजूर खाण्याचे फायदे नक्की घेऊ शकतात.   तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तो आपल्या मित्रपरिवाराला सोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!