काजू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे | Health benefits of Cashews in marathi

अनेक वेळा आपण प्रवासात टाईमपास म्हणून काजू घेऊन खात असतो. मात्र या काजूचे आपल्या शरीरासाठी अनेक आरोग्यदायी फायदे आहे. या लेखातून आपण काजू खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात हे जाणून घेणार आहे. Health benefits of eating cashews in Marathi

शरीराला लागणारी खनिज आणि पोषक तत्व काजूत मोठ्या प्रमाणात आहेत. यात कॉपर, झिंक, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांचा समावेश होतो. सोबतच काजूत चांगले फॅट्स, प्रोटीन आणि फायबर्स देखील असतात.

Health benefits of eating cashews in Marathi

हृदयासाठी फायद्याचे

काजू खाणं तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. कारण यात मोनो सॅच्युरेटेड आणि पॉली सॅच्युरेटेड फॅट्स चांगल्या प्रमाणात असतात.

2007 मध्ये ब्रिटिश जनरल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनानुसार जे लोक आठवड्यात चार पेक्षा जास्त वेळा काजू खातात, त्यांच्या हृदय संबंधीचे आजारांचं प्रमाण 37 टक्क्यांनी कमी झालं. त्यामुळे हृदयासंबंधीचे आजार दूर ठेवण्यासाठी काजूचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं

पेशींचे संरक्षण करण्यासाठी 

काजूत अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे तुमच्या पेशींचं नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी गरजेचे असतात. त्यामुळे आहारात अँटिऑक्सिडंट असणाऱ्या पदार्थांचा समावेश गरजेचा असतो आणि काजूत हे घटक असल्यामुळे पेशींचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. तसंच भाजलेल्या काजूमध्ये हे अँटिऑक्सिडंट कच्चा काजूपेक्षा जास्त असतात.

रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते

काजूमध्ये फायबरचे प्रमाण देखील जास्त असतं. त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. म्हणून रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात काजूचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी याबाबत निर्णय आपल्या डॉक्टरांसोबत चर्चा करून घ्यावा.

कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रणात राहते

आपल्या शरीरात दोन प्रकारच्या कोलेस्टेरॉल असतात- LDL आणि HDL

LDL आपल्या शरीरासाठी घातक असतात. कारण हे कोलेस्टेरॉल शरीरातील फॅटला रक्तवाहिन्यांत पर्यंत घेऊन जाण्याचे काम करतात. दुसरीकडे HDL कोलेस्टेरॉल खराब LDL ला घेऊन लिव्हरपर्यंत जातात आणि हृदयाला वाचतात.

काजूच्या सेवनानं या खराब LDL कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.

मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी काजू खाणं चांगलं असतं का? 

लुईझियाना स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार जे लोक काजू, बदाम खातात त्यांच्यात हृदयासंबंधीचे आजार आणि टाईप टू मधुमेहाचा धोका कमी झाल्याचं दिसून आलं होतं. 

तसेच अनेक आहारतज्ञ मधुमेह असणाऱ्या रुग्णांना प्रोटीन आणि फायबर्स असणाऱ्या सुकामेवाचा समावेश आहारात करण्याचा सल्ला देतात. 

कारण काजू, बदाम सारख्या सुक्या मेव्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. जेणेकरून यांचं सेवन केलं तरी तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

तुम्हाला काजू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे Health benefits of eating cashews in marathi लेख आवडला असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा. हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे.

या माहितीचा वैद्यकीय वापर करण्याअगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

Leave a Comment

error: Content is protected !!