जाणून घ्या दूध पिण्याचे फायदे | Benefits of Drinking Milk in Marathi

अनेक जण लहानपणापासून दुधाचं सेवन करत असतात. दूध पिणारे लोक तंदुरुस्त असल्याचं तुम्ही पाहिले असेल. पण काही लोक दुधाचं सेवन करत नाहीत. या लेखातून तुम्हाला दूध पिण्याचे फायदे सांगणार आहे. Benefits of drinking milk in marathi 

दुधाचं सेवन आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं. कारण दूध पोषक तत्व आणि जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहे. यात कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फरस, विटामिन ए आणि बी 12 सारखी महत्त्वाचे पोषक तत्व आहेत. त्यामुळे दुधाचे सेवन करणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.

दूध पिण्याचे फायदे Benefits of drinking milk in marathi 

दुधाच्या सेवनाने आपली हाडं मजबूत होतात. तसेच आपल्या शरीराचा विकास होण्यासाठी, आजारासोबत लढण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते. 

हाडं आणि दात मजबूत राहतात Helps strengthen bones

दुधामध्ये असणाऱ्या कॅल्शिअम आपल्या हाडांसाठी आणि दातांसाठी गरजेचं असतं. तसेच शरीरातील स्नायू तयार करण्याच्या प्रक्रियेत लागणारे प्रोटीन देखील दुधात उपलब्ध असतात. त्यामुळे जिम मध्ये जाणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात दुधाचा समावेश असतो.

तुम्ही गाय, म्हैस, बकरी, उंट यासारख्या प्राण्यांच्या दुधाचं सेवन करू शकतात. पण महाराष्ट्रासारख्या भागात गाई म्हैस दुधाचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं.

दूध पिण्याचे फायदे

डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे | Benefits of Dark Chocolate in marathi

दूध शरीराला हायड्रेट करतं

तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता कमी झाली असेल तर दुधाच्या सेवनाने देखील चांगला फायदा होतो. तसेच तुम्हाला दिवसभर ऊर्जा देखील मिळते. एका संशोधनानुसार जेव्हा तुम्ही व्यायाम करता आणि तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता होते. 

तेव्हा तुमच्या शरीराला हायड्रेट करण्यासाठी पाणी आणि स्पोर्ट्स ड्रिंक दुधाचं सेवन फायदेशीर ठरतात. व्यायाम केल्यानंतर शरीरातील पाण्याची कमतरता दूध पिल्यानंतर भरून निघते.

तसेच व्यायामादरम्यान शरीरातून कमी होणारे इलेक्ट्रॉलाईट्स देखील पूर्ववत होतात. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की व्यायामानंतर दूध पिणार किती महत्त्वाचा ठरू शकतो. 

दूध पिण्याचे फायदे

काजू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे | Health benefits of Cashews in marathi

डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगल

डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी विटॅमिन ए ची आवश्यकता असते. दुधात विटॅमिन ए चे प्रमाण असल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत होते जर तिच्या शरीरात विटामिन याची कमतरता असेल रातांधळेपणा येऊ शकतो त्यामुळे सेवन केल्याने शरीरातील विटॅमिन ए ची कमतरता होणार नाही.

स्मरणशक्ती वाढते

दूध पिल्यानंतर तुमची स्मरणशक्ती देखील वाढू शकते. एका संशोधनानुसार दुधाच्या सेवनामुळे अल्जाइमर सारख्या आजारांना रोखला जाऊ शकतो. विटामिन बी-12 जास्त असल्याने तुमची स्मरणशक्ती तंदुरुस्त राहण्यासाठी मदत मिळते. याला 2012 मध्ये टूफ्स युनिव्हर्सिटीत केलेल्या अभ्यासाचा आधार आहे.

दूध पिण्याचे फायदे

या अभ्यासात असे दिसून आलं होतं की ज्या लोकांमध्ये विटॅमिन बी 12 ची कमतरता असते, त्यांच्यात स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. पण दुधात या जीवनसत्त्वाचं प्रमाण जास्त असल्याने तुमची स्मरणशक्ती तंदुरुस्त राहू शकते. 

किवी खाण्याचे आरोग्यदायी फायदे | Health Benefits of Kiwi fruit in Marathi

वजन नियंत्रणात राहतं

दुधाच्या सेवनाने तुमचं वजन देखील नियंत्रणात राहू शकतं. कदाचित तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल. मात्र इस्राईलच्या नेवेव विद्यापीठात केलेल्या अभ्यासानुसार वजन कमी करण्यासाठी दुधात भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

कारण यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चं प्रमाण जास्त असल्याने शरीरातील चरबी कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरते. तसेच दुधात प्रोटीन आणि पाण्याची प्रमाण देखील जास्त असतं. यामुळं तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्याची जाणीव होते.

दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? What is the best time to drink milk?

आयुर्वेदानुसार, प्रौढांसाठी दुधाचे सेवन करण्याचा सर्वोत्तम वेळ झोपण्यापूर्वी आहे. लहान मुलांसाठी, आयुर्वेद सकाळी लवकर दुधाचा डोस देण्याची शिफारस करतो. रात्री दूध प्यायल्याने ‘ओजस’ वाढतो. जेव्हा आपण योग्य पचन प्राप्त करता तेव्हा ओजसला आयुर्वेदात एक अवस्था म्हणून संबोधले जाते.

आपण रात्री दूध पिऊ शकतो का? Can we drink milk at night?

आयुर्वेदानुसार, रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिण्याची शिफारस केली जाते. वसंत लाड यांच्या आयुर्वेदिक घरगुती उपचारांच्या संपूर्ण पुस्तकात असे म्हटले आहे, “थोडे आले, वेलची आणि हळद घालून एक कप गरम दूध पिण्यास विसरू नका. झोपेच्या वेळी दूध प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.

दिवसातून किती दूध प्यावे? How much milk should drink a day?

कॅल्शियम, प्राणी प्रथिने आणि व्हिटॅमिन बी 12 च्या सेवनासाठी दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक पौष्टिक मार्गदर्शक तत्त्वांद्वारे दुधाच्या सेवनाची शिफारस केली जाते. युनायटेड स्टेट्समध्ये, राष्ट्रीय आहार मार्गदर्शक तत्त्वे शिफारस करतात की प्रौढांनी तीन कप किंवा 732 mL/d दूध प्यावे.

दुधानंतर पाणी पिऊ शकतो का? Can we drink water after milk?

दुधानंतर पाणी प्यायल्याने दुधाच्या प्रथिनांसाठी चयापचय प्रक्रिया मंदावते आणि पोट आम्लयुक्त बनते. पाणी पिलेल्या दुधाच्या प्रतिक्रियेत पोटात तयार होणारी ऍसिडस् पातळ करते, ज्यामुळे जास्त ऍसिड तयार होतात, ज्यामुळे असंतुलन होते.

केळी खाल्ल्यानंतर दूध पिऊ शकतो का? Can we drink milk after eating banana?

अभ्यासानुसार, केळी आणि दुधाचे एकत्र सेवन केल्याने आपल्या पाचन तंत्राला त्रास होतो कारण ते जड असते तर आपल्या सायनसमध्ये देखील व्यत्यय येतो. यामुळे सायनस रक्तसंचय, सर्दी आणि खोकला आणि शरीरावर पुरळ यासारख्या इतर ऍलर्जी होतात

तुम्हाला दुध पिण्याचे फायदे Benefits of Drinking Milk in Marathi आवडले असल्यास हा लेख नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!